राष्ट्रवादी म्हणतेय जॉबदो, जवाबदो

पुणे :

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपसह ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसही सज्ज झाली आहे. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा जवाब दो नावाचा ट्रेंड या पक्षाने सेट केला आहे.

मोदींना घेरण्यासाठी देशभरातील प्रादेशिक पक्ष व कॉंग्रेस कामाला लागले आहेत. आतापर्यत त्यांनी पावणेपाच वर्षांत अर्थव्यवस्थेची कशी वाट लावली आहे, याकडे लक्ष वेधण्यासह अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागत असल्याचाही मुद्दा आता राष्ट्रवादीने हातात घेतला आहे. तरुणांना आपलेसे करण्यासाठीचा हा राष्ट्रवादीचा प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी होत आहे. मात्र, धर्म व रामाच्या मुद्द्यावर मोदीमय झालेले युवक कितपत या ट्रेंडमध्ये सहभागी होतात यावरच पुढील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*