ईव्हीएम घोटाळ्याला घाबरत नाही : शिवसेना

पुणे :

महाराष्ट्रातील जनता शिवसेना पक्षासोबत असून कोणी ईव्हीएम घोटाळा केला तरीही सेनेचा विजय निश्चित आहे. शिरूरची जागाही पक्ष नक्की राखेल असा ठाम विश्वास शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

चाकण येथे आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात बोलताना त्यांनी सेनेची बाजू उपस्थितांना समजून सांगितली. तसेच भाजप आणि राष्ट्रवादी यांचे नाव न घेता टीकाही केली. यावेळी आमदार सुरेश गोरे, कल्पना आढळराव पाटील, मनीषा गोरे, शिवसेनेच्या जिल्हा संघटक विजया शिंदे, नंदा कड, तनुजा घनवट, किरण मांजरे, तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर यांच्यासह महिला व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*