कांद्याचा झाला ४०० रुपयांत वांधा

नाशिक :

कांद्याचे भाव वाढण्याची कोणतीही चिन्हे नाहीत त्यातच आता या पिकाचे भाव सध्या ४०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षाही कमी झाले आहेत. आवक वाढत असतानाच अशा पद्धतीने कांद्याचा वांधा झाल्याने उत्पादक आणखी संकटात सापडले आहेत.

सध्या बाजारात मोठ्या प्रमाणावर लाल कांद्याची आवक होत आहे. परिणामी मागणीच्या तुलनेत सध्या बाजारात लाल कांद्याचा पुरवठा जास्त दिसतो. त्याचाच फटका उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात कांद्याला १५० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव आहेत. मुंबई, नाशिक, अहमदनगर व सोलापूर या कांदा उत्पादक पट्ट्यात सध्या असेच दर आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*