
अहमदनगर :
सांगलीच्या बदल्यात राष्ट्रवादीची नगरची लोकसभेची जागा काँग्रेसला मिळण्याची चर्चा सुरु असतानाच आता नगर जिल्ह्यात एक नवा फ्रेश मेसेज विखे गटाकडून व्हायरल केला जात आहे. त्यानुसार नगरच्या बदल्यात पुणे शहर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला दिली जाणार असल्याचा संदेश कार्यकर्त्याना व्हायरल करण्यात आला आहे. मात्र, हा मेसेज कितपत विश्वासार्ह आहे, याबद्दल नगर जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.
व्हाट्सअपद्वारे सध्या एक राजकीय मेसेज जोरात व्हायरल होत आहे. विखेंसह नगर जिल्हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये याची जोरात चर्चा आहे. त्यात म्हटले आहे की, नगरची जागा युवा नेते डॉ. सुजय विखे यांच्या मागणीनुसार काँग्रेसला देण्याचा निर्णय दिल्लीत झाला आहे. त्या बदल्यात राष्ट्रवादीला पुणे शहराची जागा दिली जाणार आहे. पुण्यातून राष्ट्रवादी खासदार वंदना चव्हाण यांना उमेदवारी करण्याची संधी दिली जाणार आहे. मात्र, दोन्ही जिल्ह्यातील बंडाळी टाळण्यासाठी आज-उद्या रात्री उशिरा हा निर्णय आघाडीतर्फे जाहीर केला जाणार आहे.
Be the first to comment