म्हणून नगरची जागा सुजय विखेंसाठी सोडली..!

अहमदनगर :

काँग्रेस की राष्ट्रवादी यापैकी नगरची जागा कोण लढविणार हा प्रश्न निकाली काढीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ही जागा डॉ. सुजय विखे यांना सोडण्याची घोषणा केली आहे. पंढरपूर येथील कार्यक्रमात पवार साहेबांनी याचे संकेत दिले.

‘पवार साहेबांनी त्यांचा नातू समजून सुजयला संधी द्यावी’, असे भावनिक आवाहन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केले होते. त्यालाच सकारात्मक प्रतिसाद देत पवार साहेबांनी नगरची जागा सुजय यांच्यासाठी सोडली आहे.

आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्रात आहेत. विखे यांनी धुळ्यात त्यांची भेट घेऊन हा मुद्दा पुन्हा एकदा मांडला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही पवार साहेबांशी बोलून यावर आजच निर्णय घेण्याचा आग्रह धरला. त्यानंतर चक्रे फिरून राष्ट्रवादीने ही घोषणा केली. नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीला योग्य संदेश देण्यासाठी ही घोषणा राहुल गांधी यांच्याऐवजी पवार साहेबांनी केली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*