जाहीर दिलगिरी | विखेंना अजूनही ग्रीन सिग्नल नाही

अहमदनगर :

अकलूज येथे पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नये शरद पवार यांनी नगरची लोकसभा जागा काँग्रेसला म्हणजेच डॉ. सुजय विखे यांना देत असल्याचे वृत्त कृषीरंगने जाहीर केले होते. मात्र, याबद्दल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अधिकृत प्रतिक्रिया देताना असा कोणताही निर्णय झालेला नसल्याचे म्हटले आहे.

पवार साहेब यांच्या व्हिडिओत ते नीट न बोलता आल्याने घोळ झाल्याचे दिसते. वृत्तवाहिन्यांनी त्याबद्दल माहिती देण्यात चूक झाल्याचे मान्य केले आहे. आम्हीही त्यांच्याच हवाल्याने बातमी दिली होती. मात्र, राष्ट्रवादीने याबद्दलचे वृत्त फेटाळले आहे. पवार साहेबांचा आवाज स्पष्ट येत नसल्याने ही चूक आमच्याकडून झालेली आहे. त्याबद्दल कृषीरंग परिवार वाचकांची जाहीर दिलगिरी व्यक्त करीत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*