माझ्या व मोदींविरोधात चोट्टे झाले एक : दानवे

जालना :
शहरातील प्रभाग ११ मधील विकास कामांच्या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एका विरोधकांवर बोचरी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व आपल्या विरोधात चोट्टे एक झाल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की, माझ्यामागे उभे राहायला मी पैसे देत असतानाच त्यांना (विरोधक) पैसेच मी भेटू देत नाही. मोदी व माझ्याविरोधात सगळे चोट्टे एक होऊन लढत आहेत. देशातील चोट्टे मोदींना विरोध करतात, तर जालन्यातले चोट्टे मला विरोध करतात. मात्र, आम्ही त्यांना पुरून उरणार आहोत.

दानवे यांच्या विरोधात शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर आणि प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी दंड थोपटले आहेत. त्यांनी या दोघांपैकी कोणाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून ही जहरी टीका केली हे समजू शकलेले नाही. मात्र, पैसे आणि चोट्टे असे वादग्रस्त वक्तव्य केलेला व्हिडीओ सध्या जोरात व्हायरल होत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*