हा असेल सेनेला दुसरा धक्का..!

नागपूर / चंद्रपूर :

सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवबंधन तोडल्यानंतर आता आणखी एक शिवसेना आमदार जय महाराष्ट्र करून कॉंग्रेस पक्षात डेरेदाखल होण्याची चर्चा विदर्भात सुरु आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील आमदार सुरेश धानोरकर हे सेनेला दुसरा धक्का ददेणार असल्याचे बोलले जाते.

सेना नेतृत्वावरील नाराजी धानोरकर यांनी वेळोवेळी बोलून दाखविली आहे. भाजप खासदार हंसराज अहिर यांच्यात आणि त्यांच्यात टोकाचा विरोध आहे. त्यामुळेच युती झाल्यावर अहिर यांचे काम करण्याऐवजी धानोरकर यांनी सेनेला जय महाराष्ट्र करण्याची तयारी केल्याची चर्चा आहे. पूर्व विदर्भात ते सेनेचे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे सेनेला विदर्भात मोठा धक्का बसेल असे बोलले जात आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*