नगरमध्ये राष्ट्रवादीचाच खासदार होणार : अजित पवार

पुणे :

अहमदनगरची जागा राष्ट्रवादीची आहे, आणि यंदाही पुन्हा पक्ष ही जागा लढवून येथून खासदार दिल्लीत पाठाविणार असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केला आहे.

पुण्यातील कार्यक्रमात त्यांनी जागावाटपावर बोलतानाच नगरच्या जागेवरील हक्क पुन्हा एकदा बोलून दाखविला आहे. ते म्हणाले की, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा झालेली आहे. त्यानुसार ८ मार्चपर्यंत जागावाटप पूर्ण होईल. मात्र, त्यांनी अजूनही नगरच्या जागेवरून कोण लढणार याबद्दल सांगितले नाही. त्यामुळेच येथून कोण लढणार हा संभ्रम अजूनही ४-५ दिवस असणार असेच दिसते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*