सुजय विखेंच्या अडचणीत भर..!

अहमदनगर :

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास ४-६ दिवस बाकी असतानाही अहमदनगरसह राज्यातील आघाडीच्या जागावाटपाचा तिढा कायम आहे. त्यातच आज राष्ट्रवादी नेते अजितदादा पवार यांनी ही जागा न सोडण्याचा पुनरुच्चार केल्याने डॉ. सुजय विखे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

कान्हूर पठार (ता. पारनेर) येथील कार्यक्रमात डॉ. विखे यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढविण्याचा पुनरुच्चार केला आहे. काहीजण विघ्नसंतोषी मंडळी उमेदवारी न मिळाण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगून त्यांनी दिवंगत माजी खासदार बाळासाहेब विखे यांच्या कार्यकर्त्यांना साद घातली. मात्र, राष्ट्रवादीने आघाडीच्या जागावाटपात ही जागा कॉंग्रेसला न सोडल्यास अपक्ष किंवा भाजपत जाऊन उमेदवारी घेण्याशिवाय विखे गटाला पर्याय नाही. विखे गट काय निर्णय घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*