म्हणून लोकसभा लढविणार : राणे

मुंबई :

शिवसेना पक्षाला कोकणच्या विकासाचे देणेघेणे नाही. त्यांच्या पालकमंत्री व आमदारांनी मागील पाच वर्षांत कोकणाकडे दुर्लक्ष केले. मात्र, राज्य सरकारशी भांडून मोठा निधी राणे कुटुंबाने आणला. यंदाची निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष कोकण आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्यावर लढविणार असल्याचा पुनरुच्चार माजी मुख्यमंत्री व पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी केला.

मुंबईत रंगशारदा येथील कोकण मेळाव्यात मार्गदर्शन करताना राणे यांनी आगामी राजकीय दिशा स्पष केली. यावेळी माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, माजी आमदार श्याम सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत, प्रवक्ते संदीप कुडतरकर, मुंबईचे अध्यक्ष राजेश हाटले, नवी मुंबईचे माजी महापौर चंदू राणे, संतोष पाटील, योगेश गावडे-पाटील यांच्यासह राणे यांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या प्रामाणावर उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*