डॉ. सुजय विखे असणार राष्ट्रवादीचे उमेदवार..?

अहमदनगर :

काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि नगर जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांचे पुत्र डॉ. सुजय यांचा राष्ट्रवादी काँगेस पक्षातील प्रवेश निश्चित झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोकमतच्या वृत्ताच्या हवाल्याने आता ते आज-उद्याच राष्ट्रवादीकडून उमेदवार म्हणून घोषित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हातात काहीच नसताना इच्छाशक्ती व आशावाद यावर डॉ. सुजय यांनी दोन वर्षांपूर्वी आपलीच उमेदवारी जाहीर करून प्रचार सुरू केला. आतापर्यंत त्यांनी नगर दक्षिणेतील सर्व गावांत कार्यकर्त्यांचे सक्षम जाळे विणले आहे. याच जाळ्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राष्ट्रवादी अखेर फसली. इतर सर्वांच्या तुलनेत फक्त सुजय विखे दिसत असल्याने अखेर येथून त्यांना संधी देण्यावर मुंबईत एकमत झाल्याचे विखे गटाचे म्हणणे आहे. मात्र, त्यांच्यासाठी पक्षाने ही जागा देताना इतर राष्ट्रवादी इच्छुकांनी बंडाळी करू नये यासाठी बारामतीकरांना मोठी कसरत करावी लागणार असेच बोलले जात आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*