महाराष्ट्रात 22 हजार किलोमीटर काँक्रीट रोड..!

अहमदनगर :

महाराष्ट्रात मागील फ़क़्त चार वर्षांत 22 हजार किलोमीटर काँक्रीटच्या रोडची निर्मिती भाजप-शिवसेना सरकारने केली आहे. त्यापैकी बहुसंख्य रस्ते मार्च महिन्यात वाहन चालकांसाठी खुले होतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री तथा महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

नगर जिल्ह्यात कोल्हार घोटी राज्यमार्गावरील संगमनेर ते बारी यादरम्यान मंजूर केलेल्या हायब्रीड अँन्युटी योजनेतील रस्त्याचे भूमिपूजन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात पाटील बोलत होते. या कार्यक्रमास पालकमंत्री राम शिंदे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, भानुदास बेरड, रामभाऊ  जाजू आदि उपस्थित होते.

१६८ कोटी रुपयांच्या या रस्त्यासह यंदा राज्यात अनेक प्रमुख रस्ते केले जाणार आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत रस्त्यांचे बजेट दुप्पट करून 17 वरून 30 हजार कोटी रुपयांवर नेले आहे. त्यामुळे राज्याची कनेक्टीव्हिटी सुधारणार असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*