तरच नगरचे जिल्हाविभाजन शक्य..!

अहमदनगर :

निवडणुका जवळ आल्या की नगर जिल्ह्यात दक्षिणेत सकाळाई सिंचन योजना व उत्तर जिल्ह्यात जिल्हाविभाजन हे मुद्दे चर्चेत येतात. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होत आहे. मात्र, या दोन्हीपैकी किमान जिल्ह्याच्या विभाजनाचा डाव पार पडून लोकसभेच्या दोन्ही (नगर व शिर्डी) जागा पुन्हा एकदा मिळविण्याचा डाव शिवसेना-भाजप युतीचे सरकार करण्याची शक्यता वाढली आहे.

उत्तरेतील मातब्बर विखे गटाने दक्षिण नगर जिल्ह्यात आपले बस्तान बसविलेले आहे. त्यातूनच यंदा दिवंगत माजी खासदार बाळासाहेब विखे यांचे नातू व सध्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय नगरच्या जागेसाठी आग्रही आहेत. त्यांना राष्ट्रवादीने येथून उमेदवारी दिल्यास नगरसह शिर्डीच्या जागेवरील विजयाचे पारडे विखे गट फिरवू शकेल. हाच डाव यशस्वी होऊ न देण्यासाठी जिल्हाविभाजन हा मुद्दा भाजपल-सेनेला मदतीचा ठरू शकतो.

दि. ७ मार्चला मंत्रिमंडळ बैठक आहे. तत्पूर्वी पालकमंत्री राम शिंदे यांनी लोकसभा आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जिल्ह्याच्या विभाजनाचा मुद्दा निकाली काढण्याचे अवसान श्रीरामपूर जिल्हा कृती समितीला दिले आहे. विभाजन केल्यानंतर उद्भवणाऱ्या स्थितीत निवडणुका उरकून घेत दोन्ही जागा राखण्याची खेळी प्रदेश भाजप व शिवसेना पक्ष खेळू शकतात, असेच शिंदे यांनी सूचित केलेले आहे. असेच असेल तर, पुढील दोन-तीन दिवसांत नगरचे दोन जिल्हे होऊ शकतील. असे नाहीच झाले तर मात्र, भाजप व शिवसेनेला विखे गट जिल्ह्यात पुरून उरेल असेच चित्र आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*