शिवसेना शेतकऱ्यांची वैरी : लंके

पुणे (नारायणगाव) :

यापूर्वी ज्या पक्षात काम केले तो पक्ष शेतकऱ्यांचा वैरी आहे. डॉ. अमोल कोल्हे आणि मी दोघांनीही त्यामुळेच हा पक्ष सोडल्याचे पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादी नेते निलेश लंके यांनी सांगितले.

शिवसेना सोडल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. कोल्हे यांच्या स्वागतासाठी आयोजित कार्यकर्ता बैठकीत निलेश लंके यांनी तडाखेबाज भाषण केले. त्यांनी शिवसेना पक्षाचे नाव घेतले नाही. मात्र, कोल्हे व लंके दोघेही आधीचे शिवसैनिक आहेत. त्यावरून उपस्थित काय ते समजले. ते म्हणाले की, जुना पक्ष शेतकऱ्यांचा वैरी होता. मात्र, आताचा पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष शेतकऱ्यांचा कैवारी आहे.

यावेळी डॉ. कोल्हे यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी विधानसभा सभापती दिलीप वळसे पाटील, माजी आमदार विलास लांडे, सत्यशील शेरकर, संभाजी काळे, अतुल बेनके यांचासः शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*