सुजयबद्दल मीच पेपरात वाचतोय : शरद पवार

अहमदनगर :

नगर लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारीचा घोळ आज-उद्या मिटणार आणि डॉ. सुजय विखे राष्ट्रवादी पक्षात येऊन खासदार होणार असे बोलले जात होते. मात्र, त्या सर्व चर्चांना पूर्णविराम देत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुजयला आम्ही उमेदवारी देत असल्याचे मीच पेपरात वाचतोय, अशी गुगली फेकीत विखे गटाला पुन्हा एकदा क्लिनबोल्ड केले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना विचारलेल्या प्रश्नाबाबत उत्तर देताना पवार साहेबांनी नगरमधून पक्षाच्या उमेदवाराला संधी देतानाच बाहेरून येणाऱ्या कोणालाही उमेदवार करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, मी विखेंना अजूनही भेटलो नाही. सुजय आमच्याकडून लढण्यासाठी तयार असून आम्ही उमेदवारी दिलायचे माध्यमातून वाचून माझेही ज्ञान वाढतेय.

पवार साहेबांनी पुन्हा एकदा येथून विखे कुटुंबातील कोणालाही संधी दिली जाणार नसल्याचे यानिमित्ताने सूचित केले आहे. त्यामुळे विखे गट पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. कार्यकर्त्यांनी अपक्ष लढण्याचा दबाव निर्माण केल्याने यंदा नगर दक्षिणेत पुन्हा तिरंगी लढत होण्याची शक्यता वाढली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*