शेती व बेरोजगारी हेच प्रचाराचे मुद्दे : चव्हाण

पुणे :

आगामी लोकसभा निवडणुकीत दहशतवादी हल्ल्यामुळे कोणताही परिणाम दिसणार नाही. या दुर्दैवी हल्ल्याने देशाची अपरिमित हानी झाली आहे. भाजप त्याचाही राजकीय लाभ उठवीत आहे. मात्र, कॉंग्रेस पक्ष लोकसभेच्या प्रचारात फ़क़्त शेती आणि बेरोजगारी याच दोन मुद्यांना महत्व देऊन प्रचार करणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

सर्जिकल स्ट्राईक विषयाचे कॉंग्रेसने कधीही राजकारण केले नसल्याकडे लक्ष वेधतानाच त्यांनी भाजपच्या धार्मिक धृविकारणामुळे होणाऱ्या दुष्परिणाम आणि सामाजिक तेढ या मुद्यांकडे काँग्रेस आता लक्ष देणार आहे. त्याबद्दल समाजाला समजावून सांगणार असल्याचेही म्हटले आहे.

ते म्हणाले की, देशाची सुरक्षा महत्वाची आहे. मात्र, शेतीची दुरवस्था आणि तरुणांमधील वाढती बेरोजगारी यामुळे देशांतर्गत वातावरण बिघडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणांचा हा परिपाक आहे. त्यामुळेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यंदा फ़क़्त शेती आणि वाढत्या बेरोजगारीवर कॉंग्रेस पुढील काळात काय करणार हेच सांगतील.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*