‘वंचित’चा खर्च कोण करते : चव्हाण

पुणे :

आगामी लोकसभा निवडणुकीच्या कॉंग्रेस पक्षाच्या धोरणाबद्दल लोकमत वृत्तपत्राने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेतली आहे. त्यात चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीच्या सभांना होणारी गर्दी व त्यावरील लाखोंचा खर्च कोण करतो, असा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर आघाडीच्या मुद्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे. मात्र, त्यांनी 22 जागांची मागणी करीत आघाडीसाठी उत्सुक नसल्याचा संदेश दिलेला आहे. त्याच पार्शवभूमीवर चव्हाण यांनीही वंचित बहुजन आघाडीकडील खर्चाबद्दल प्रश्न उपस्थित केलेला दिसतो.

ते म्हणाले की, कॉंग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातल्याचा इतिहास आहे. त्या मुद्यावर आमचेही त्यांच्याशी एकमत आहे. संघाबद्दलच्या त्यांच्या प्रस्तावावर कॉंग्रेस डोळे झाकून सही करेल. आम्ही त्यांना आघाडीचा प्रस्ताव दिला आहे. आता त्यावर त्यांनाच निर्णय घ्यायचा आहे. मात्र, त्यांच्या सभांना होणारी गर्दी आणि त्यावर होणारा मोठा खर्च नेमका कोण करीत आहे?

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*