जातीच्या मुद्यावरून आढळराव पाटील लक्ष्य

पुणे :

शिवसेना पक्षातून नुकतेच राष्ट्रवादीमय झालेल्या सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या जातीवरून शेरेबाजी केलेले खासदार आढळराव पाटील आता सोशल मिडीयावर अनेकांचे लक्ष्य ठरले आहेत.

‘ते (कोल्हे) माळी समाजाचे असल्याने त्यांनी (राष्ट्रवादी) विचार केला असावा’, असे म्हणून आता खासदार पाटील यांनी या लोकसभा निवडणुकीत जातीची किनार जोडली आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना डॉ. कोल्हे यांनी समंजसपणे ‘माझी जात फ़क़्त छत्रपती शिवाजींचा मावळा आहे’, असे सांगून जास्त बोलण्याचे टाळले होते. मात्र, अनेक तरुणांना खासदार पाटील यांचे जातीयवादी धोरण पटलेले नाही. त्यामुळे ते सध्या सोशल मिडीयावर ट्रोल होत आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*