दुष्काळी विद्यार्थी सरकारविरुद्ध आक्रमक

अहमदनगर :

राज्यात भीषण दुष्काळ पडलेला असतानाही राज्य सरकार आणि पुणे विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना सवलती दिल्या जात नसल्याकडे लक्ष वेधण्यासाठी नगर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसतर्फे पुणे विद्यापीठ उपकेंद्रासमोर आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, दादा दरेकर, लंकेश चितळकर, अक्षय गायकवाड, वैभव म्हस्के, अजित कोतकर, राहुल नेटके, विकास झरेकर, नितीन बुगे, अनिकेत चव्हाण, सचिन होले, इम्रान पठाण आणि विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ झाले असताना, त्याची अंमलबजावणी होण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने नगर मधील सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे उपकेंद्राच्या कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*