निवडणुकीवर होणार १७४५ कोटी खर्च

मुंबई :

आगामी लोकसभा निवादानुकीचिया आचारसंहिता लागू होण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत. त्याचवेळी राज्य निवडणूक आयोगाने आपली तयारी पूर्ण केली आहे. या लोकसभा निवडणुकीसह आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एकूण १७४५ कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद राज्य सरकारने केलेली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी ८४१ कोटी आणि विधानसभा निवडणुकीसाठी ९१३ कोटी रुपये आर्थिक तरतूद राज्याच्या बजेटमध्ये केलेली आहे. सामान्य प्रशासन विभागाने वाढलेले मतदार आणि खर्च लक्षात घेऊन लोकसभेसाठी ८५० कोटींची मागणी केली होती. निवडणूक खर्चासाठी म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाला तातडीने ८० टक्के निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यानंतर गरजेनुसार उरलेला निधी देण्याची तरतूद असते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*