आघाडी-युती थेट एकमेकांना भिडणार

मुंबई :

यंदाच्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून महाराष्ट्र राज्यात चार टप्प्यात मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे. त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसह भाजप-शिवसेना युती सज्ज झाली आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडी कोणाला झटका देणार, यावरच यंदा राज्यातील पक्षीय बलाबल ठरणार आहे.

सत्ताधारी भाजप-सेनेला झटका देऊन पुन्हा सत्तासोपान चढण्यासाठी काँग्रेस आघाडी तयारीत आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांचे पुन्हा सत्तेत येण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजप कामाला लागला आहे. त्याचवेळी नागपूरच्या आरएसएस परिवारातील मंडळींवर कारवाई करण्यासह संविधान रक्षण आणि वंचित समूहांना सत्तेत संधी देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी लढत आहे. काही ठिकाणी वंचितांच्या उमेदवारांची ताकद मोठी आहे. तर, काही ठिकाणी मात्र, त्यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेस आघाडीला फटका बसून भाजप-सेना उमेदवारांना फायदा होण्याची शक्यता राजकिय विश्लेषक व्यक्त करीत आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*