डॉ. सुजय यांच्याविरोधात कोण..?

अहमदनगर :

वडील राधाकृष्ण विखे काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते आणि आई शालिनीताई त्याच पक्षातर्फे जिल्हा परिषदेत अध्यक्ष असताना आघाडीकडून लोकसभेची उमेदवारी मिळत नसल्याने डॉ. सुजय विखे यांनी बंडाचा झेंडा फडकविला आहे. आई-वडील यांचा काँग्रेस पक्ष सोडून देत भाजपकडून नगर दक्षिणेत डॉ. सुजय विखे नशीब अजमावून पाहणार आहेत. त्याचवेळी त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी कोणता उमेदवार रिंगणात उतरविणार, याचीही उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरची जागा आपल्याच पक्ष्याकडे ठेऊन डॉ. सुजय यांची गोची केली. दीड वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबवून लोकसभेत जाण्याचे स्वप्न ठेवलेल्या सुजय यांचा या चक्रव्यूहाच्या फेऱ्यात प्रवास सुरु झाला आहे. त्यातून ते विजयी मुद्रेने बाहेर पडणार की पराभूत होऊन राष्ट्रवादी येथून खासदार दिल्लीत पाठविणार हे निकालानंतर समजेल. मात्र, त्यांच्याविरोधात उमेदवार कोण आणि कसा प्रचार करणार यावर सगळी गणिते ठरणार आहेत.

राधाकृष्ण विखे यांनी सुजय ऐकत नसून उमेदवारी करणार असल्याचे सांगतानाच आपण पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. एकूणच या लोकसभा उमेदवारीसाठी आई-वडील व पुत्र यांचीच राजकीय ताटातूट होण्यापर्यंत हा विषय ताणल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. त्याचाच फटका सुजय यांना बसल्यास भाजपकडील ही जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात येईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*