म्हणून माढ्यातून पवारांची माघार

पुणे :

शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघात लढण्यासाठी गळ घातली आहे. त्यावर एकाच घरातील तिघेजण उमेदवार नको म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माढा (जि. सोलापूर) येथून उमेदवारी न करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना पवार साहेबांनी सांगितले की, मुलगी खासदार सुप्रिया सुळे बारामतीत लढणार आहेत. तर, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पुत्र पार्थ मावळसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे यंदा मी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*