पुन्हा एकदा विखेंना नगरमध्ये हरवू : पवार

पुणे :

यापूर्वी आम्ही दिवंगत माजी खासदार बाळासाहेब विखे यांचा नगर दक्षिणमध्ये आम्ही पराभव केला होता. हा इतिहास सर्वांना माहिती आहे. विखे असोत की कोणीही यंदा नगरची जागा राष्ट्रवादी जिंकणार असल्याचा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, विखे यांनी मला निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यापूर्वी आम्ही एकदा विखे यांचा पराभव केला होताच. तसाच आताही आम्ही पुन्हा एकदा येथून आघाडीचा उमेदवार विजयी करून विखे कुटुंबातील कोणीही असोत त्याचा पराभव करणार आहोत. नगरची जागा काँग्रेस नाही तर, पुन्हा राष्ट्रवादी लढणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*