तर सुजयचा विचार केलाही असता : पवार

पुणे :

राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेकजण नगर लोकसभेच्या जागेसाठी उमेदवारी करण्यास तयार आहेत. जर, आमच्या पक्षाकडे सक्षम उमेदवार नसता तर आम्हीही सुजय विखे यांना आमच्या पक्षाकडून उमेदवारी देण्याचा विचार केला असता, असे स्पष्ट करतानाच येथून राष्ट्रवादीच्या पक्षनिष्ठा असलेल्या उमेदवारास संधी देण्याचे सूतोवाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले आहेत.

पुण्यातील एका कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, १९९१ मध्ये दिवंगत माजी खासदार बाळासाहेब विखे यांचा आम्ही पराभव केला होता. त्यावेळी आमच्याकडून माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी विजय मिळवला होता. नगर दक्षिणेच्या जनतेने तो कौल दिला होता. यंदाही असाच कौल मिळू शकतो. सुजय विखे यांना आम्ही उमेदवारी दिलेली नाही आणि देणारही नाहीत. त्यांचा मार्ग त्यांना मोकळा आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*