विखे पाटील गांधींच्या भेटीला..!

दिल्ली :

राष्ट्रीय काँग्रेसची बैठक संपवून राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील सोनिया गांधी यांच्या भेटीला रवाना झाले आहेत. या बैठकीत पुत्र सुजय विखे यांच्या पक्षबदलासह त्यांच्या आगामी राजकीय धोरणावर ते चर्चा करणार असल्याचे समजते.

राज्यात क्रमांक एकचे पद असतानाही मुलाला उमेदवारी मिळत नसल्याची बोच विखे कुटुंबियांना आहे. सुजय विखे यांनी तर त्याची जाहीर वाच्यता करून अपक्ष किंवा पक्ष बदलण्याची घोषणा केली आहे. मात्र, अखेरचा प्रयत्न म्हणून आजच्या दिल्लीतील बैठकीनंतर विखे पाटील आता माजी अध्यक्ष व पक्षाच्या ज्येष्ठ मार्गदर्शक सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी गेले आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवारी देण्यास असमर्थता दाखविली आहे. त्यामुळे सुजय विखे उद्या दुपारी भाजपवासी होणार असल्याचे वृत्त सूत्रांनी पेरले आहे. मात्र, राधाकृष्ण विखे पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळेच अखेरचा प्रयत्न म्हणून ते सोनिया गांधींशी चर्चा करून पाहणार असल्याचे समजते. बैठक संपल्यावर पुढील चित्र स्पष्ट होईल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*