राष्ट्रवादीला मोठा झटका; मोहिते पाटील भाजपत?

मुंबई :

अहमदनगर येथील डॉ. सुजय विखे यांच्यासह आता युवा नेते रणजितसिंग मोहिते पाटील यांनीही आता मंत्री गिरीश महाजन यांच्या उंबरठ्याला पाय लावले आहेत. त्यामुळे विखे यांच्यासह आता आघाडीला दुसरा झटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

खासदार विजयसिंह मोहिते यांच्याऐवजी माढा (जि. सोलापूर) मतदारसंघातून माजी प्रशासकीय अधिकारी प्रभाकर देशमुख यांचे नाव पुढे आल्याने मोहिते पाटील गट शरद पवार यांच्यावर नाराज आहे. त्याचाच भाग म्हणून रणजितसिंग मोहिते महाजन यांच्या भेटीला गेल्याचे समजते. या भेटीतून पुढे मोहिते पाटील गटही विखे गटासारखा भाजपवासी होण्याची शक्यता व्यक्त होते आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*