सुजय विखेंच्या विरोधात आमदार जगताप..?

अहमदनगर :

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. त्यामुळेच सुजय यांच्या विरोधात आता राष्ट्रवादीने विधान परिषदेचे आमदार अरुण काका जगताप यांना उमेदवारी देण्याची तयारी दाखवली आहे. उद्या दुपारपर्यंत काकांचे नाव अधिकृतपणे जाहीर होण्याची शक्यता आहे.

मुंबईत पक्षाच्या बैठकीत नगरच्या शिष्टमंडळाने आज स्थानिक बेरजेचे गणित आणि भाजपची गोची ठरणारे वास्तव उलगडून दाखविले. त्यावर सविस्तर चर्चाही झाली. त्यांनतर आमदार जगताप यांच्या उमेदवारीमुळे होणारे पक्षाचे फायदे व विजयी होण्याचे गणित पक्षाच्या धुरीणांनी मांडले. त्यानुसार आता जगताप यांचे नाव जाहीर करण्याचे ठरले आहे. उद्या सकाळी किंवा दुपारी त्यांचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*