वंचित लढविणार सर्व जागा : आंबेडकर

अकोला :

आम्ही आतापर्यत २२ लोकसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर केले होते. त्यांना कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी कायम ठेऊन मग पुढे चर्चेसाठी येण्याची गाराज होती. मात्र, आता कॉंग्रेस आघाडीबरोबर जाण्यासाठीची चर्चा संपल्यात जमा आहे. वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्यातील सर्व ४८ जागांवर उमेदवार देईल, अशी माहिती नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली अआहे.

ते म्हणाले की, १५ मार्चपर्यंत आमचे सर्व उमेदवार जाहीर होतील. आम्ही जाहीर केलेले २२ उमेदवार कॉंग्रेसच्या पठडीतील नाहीत असे उत्तर मिळाले आहे. रण्यात यंदाची निवडणूक शिवसेना-भाजप महायुती विरुद्ध वंचित आघाडी यांच्यात होईल. कॉंग्रेस आघाडीला सर्व ठिकाणी कोणतीही संधी उरणार नाही.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*