कामाला लागा, १९९१ ची पुनरावृत्ती करू : पवार

अहमदनगर :

उमेदवार कोण आहे यापेक्षा आपल्याला नगर जिल्ह्यात आघाडीचे उमेदवार निवडून आणायचे आहेत, हा विचार मनात पक्का करून लोकसभा निवडणुकीत कामाला लागा. १९९१ ची पुनरावृत्ती आपल्याला पुन्हा एकदा यंदा करायची आहे, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे नगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांशी बोलताना पवार यांनी यंदा जोमाने साथ देण्याची भावनिक साद घातली. ते म्हणाले की, यंदा देशात सत्ताबदल निश्चित आहे. आपल्या पक्षाला जास्त जागा मिळवून देशाच्या राजकारणात मोठे काम करायचे आहे. त्यासाठी कामाला लागा आणि आपल्या उमेदवारास विजयी करा.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*