नगरची जबाबदारी रोहित पवारांवर..!

अहमदनगर :

भाजपकडून सुजय विखे यांची उमेदवारी फायनल झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आता नगरच्या उमेदवारीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आघाडीच्या उमेदवार यादीत येथील नाव जाहीर करण्यापूर्वीच या मतदारसंघात आघाडीच्या विजयासाठी धोरण आणि समन्वय साधण्याची जबाबदारी युवा नेते रोहित पवार यांना देण्याचे ठरले आहे. पुण्यातील रोहित पवार समर्थकांनी याचे कौतुक केले आहे.

१९९१ च्या निकालाची पुनरावृत्ती करतानाच आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी धोरण तयार केले आहे. त्यानुसार बंडखोर सुजय विखे यांच्याविरोधात दमदार उमेदवार देतानाच ही जागा जिंकून राज्यात ठोस संदेश देण्याचीही तयारी पवारांनी केली आहे. कर्जत-जामखेड आणि संपूर्ण नगर दक्षिणेत युवकांशी संवाद साधून नवीन मतदारांना राष्ट्रवादीकडे आणण्याची व मतदान घडवून आणण्याची जबाबदारी त्यामुळेच रोहित पवार यांना देण्याबद्दल पक्षाची वरिष्ठ कार्यकारिणी गंभीर आहे. त्यानुसार आता नगरच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आजोबा शरद पवार आणि नातू रोहित दादा जबाबदारी घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*