‘भाजपला पाळणाघर बनवू नका’

मुंबई :

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रात अनेकांनी भाजपच्या वळचणीला जाऊन सत्तासोपान चढण्याची तयारी केली आहे. कॉंग्रेसचे लाभार्थी असलेल्या या मंडळींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी पायघड्या टाकल्या आहेत. त्यावर भाजपला वास्तवाचे भान देणारे हक्काचे पाळणाघर..! नावाचा विशेष अग्रलेख शिवसेनेचे मुखपत्र सामानातून प्रसिद्ध झाला आहे.

त्यात म्हटले आहे की, भाजप / शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये या मताची शिवसेना आहे. महाराष्ट्रातील सर्व घराणी ही काँग्रेस पक्षाची होती. या घराण्यांच्या विरोधात सेना-भाजपचा संघर्ष होता. ही घराणी विचारांचे ब्रह्मवाक्य नसल्याने वारा येईल तशी पाठ फिरवणारी आहेत. उद्या शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यावर ही घराणी शिवसेना भवनाच्या रांगेत उभी असतील. त्यामुळे आपली पक्षातील व विचारांची माणसे आणि मूळ विचारच खरा असे मानणारे कार्यकर्ते यांना संधी द्या. तात्पुरती सूज काय कामाची?

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*