आज जाहीर होणार पहिली यादी

मुंबई :

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत किमान २० जागा मिळविण्याची मोर्चेबांधणी केली आहे. अहमदनगरसह पुणे जिल्ह्यातील शिरूर, मावळ, बीड, नाशिक यासह अनेक जागांवर पक्षाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी गुरुवारी दुपारी किंवा उशिरा रात्री जाहीर होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

नगरमधून आमदार संग्राम जगताप किंवा त्यांचे वडील आमदार अरुण काका जगताप यांना संधी देण्यासाठी प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाली आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांना पक्षात घेऊन भाजपने नगर दक्षिण पुन्हा ताब्यात घेण्याची तयारी केली आहे. मात्र, भाजपचे मनसुबे उधळण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. इतरही जागांसाठी दमदार उमेदवार देतानाच स्थानिक वाद मिटविण्यासाठीचे प्रयत्न पक्षाध्यक्ष शरद पवार करीत आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*