सुजयच्या विरोधात प्रचार नाही : विखे

मुंबई :

मी काँग्रेस पक्षासमावेत असून लोकसभा निवडणुकीत राज्यभर पक्षाचा प्रचार करणार आहे. मात्र, नगर मतदारसंघात मुलगा सुजय विखे यांच्याविरोधात प्रचार करणार नाही, असे स्पष्टपणे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी म्हटले आहे.

पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, आदरणीय शरद पवार यांना विखे कुटुंबियांचा खूप राग दिसतोय. त्यांचा आमच्यावर विश्वासही दिसत नाही. त्यांनी वडील बाळासाहेब यांच्याबद्दल नको ते बोलले आहे. त्याने दुःख झाले आहे. अशावेळी राज्यभर प्रचार करणार असताना नगरमध्ये मात्र मी आघाडीच्या उमेदवाराचा अजिबात प्रचार करणार नाही.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*