शिरूरमधून डॉ. कोल्हे, तर मावळात पार्थ पवार..!

पुणे :

राष्ट्रवादी काँगेसच्या दुसऱ्या उमेदवारी यादीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांना मावळमधून तर, सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना शिरूर येथून राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे.

पवारांचे नातू पार्थ यांना उमेदवारी मिळणार की नाही, यावर पडदा टाकीत राष्ट्रवादीने या नव्या दमाच्या तरुणाला मावळ येथून उमेदवारी दिली आहे. पुणे व रायगड जिल्ह्यातील कार्यकर्ते व नेत्यांनी पार्थ यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. ते येथून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्याविरोधात लढतील.

तर, पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभेच्या जागेसाठी डॉ. कोल्हे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार आढळराव पाटील यांना डॉ. कोल्हे जोरदार टक्कर देतील असे दिसते. शिरूर व मावळ या दोन्ही जागा पक्ष जिंकणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी व्यक्त करीत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*