बीड, नाशिक व दिंडोरीचे उमेदवार जाहीर

नाशिक :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दुसऱ्या यादीत बीड, नाशिक व दिंडोरी येथील उमेदवार जाहीर केले आहेत. शिरूरमधून सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना, तर मावळ येथून पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

बीडच्या जागेवर अमरसिंह पंडित यांच्याऐवजी बजरंग सोनवणे यांना पक्षाने संधी दिली आहे. ते भाजपच्या खासदार प्रीतमताई मुंडे यांच्याविरोधात लढतील. तर, नाशिक येथील जागेवर पुन्हा एकदा माजी खासदार समीर भुजबळ आणि दिंडोरीच्या जागेवर धनराज महाले यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*