भाजपचे आयटी सेल झोपेत; नारळाला म्हणतायेत हळद

मुंबई :

देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र या लोकप्रिय फेसबुक पेजवर सलाम शेतकऱ्यांच्या जिद्दीला असा ट्रेंड भाजपच्या आयटी सेलने सुरू केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस कसे शेतकरी हितासाठी काम करतात, हे सांगण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्यात झोपेत एक इमेज पोस्ट झाल्याचे पुढे आल्याने हे पेज जोरदार ट्रेंड होत आहे.

याबद्दल माहिती देताना राज्यकर्ता साप्ताहिकाचे संपादक महादेव गवळी म्हणाले की, शेतकरी नेते असल्याचे भासविण्याच्या प्रयत्नात भाजप आयटी सेल आहे. मात्र, हळद व नारळ याचाच फरक त्यांना कळत नसल्याचे दिसते. नारळ किंवा खारीक याचे प्लॅस्टिक पिशवीतील रोपे हळद म्हणून दाखविले आहेत. भाजपला शेतीचे काहीच कळत नाही असा आरोप काँग्रेस-राष्ट्रवादी करीत आहेत. त्यांच्या याच आरोपाची पुष्टी भाजपच्या झोपळू आयटी सेलने केली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*