भाजप प्रवेशानंतरही सुजय विखेंची वाट खडतर

नगर दक्षिणेत शिवसेना आणि विखे गट यासह अपक्षही लढण्याची तयारी काँग्रेसचे बंडखोर डॉ. सुजय विखे यांनी केली होती. मात्र,अखेरीस ते भाजपवासी होत निवडणूक लढण्याच्या तयारीला लागले आहेत. मात्र, भाजपचे उमेदवार असताना त्यांना शिवसेना कितपत मदत करणार, यावर त्यांचे विजयाचे गणित ठरणार आहे.

विखे कुटूंबाने सुजय विखेंना पद, प्रसिद्धी आणि जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांची फळी दिली. सुजय हे चांगले संघटक असल्याने कमी कालावधीत त्यांनी तरूणांचे संघटन केले. पण विखे घराण्याने प्रसिद्धी समवेत विरोधही दिला. अगदी बाळासाहेब विखेंपासूनचे विरोधक आज सुजय यांना अडचण ठरत आहेत.
नगर दक्षिणेत सुजय विखेंना विरोध आधीही होता. कारण ते नगर उत्तरेतील नेते आहेत. पण भाजपमधे पक्षप्रवेश केल्यानंतरही त्यांचा विरोध वाढतो आहे. संघाचा त्यांना विरोध आहे कारण भाजपा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी अपक्ष असताना चांगलेच तोंडसुख घेतले होते. तसेच खासदार दिलीप गांधी यांना तिकीट नाकारल्यामुळे गांधीही विरोधात काम करतील, असे गांधींचे कार्यकर्ते उघडपणे सांगत आहेत. तसेच सेनेच्या अंतर्गत गोटातही विखे निवडून येऊच शकत नाही असे कार्यकर्ते ठामपणे म्हणत असल्याचे सुत्रांचे म्हणने आहे. भाजपला असलेला विरोधातून ते बोलत असल्याचे दिसते. त्यांची नाराजी कळीचा मुद्दा ठरू शकतो. तसेच राष्ट्रवादी तेथे तगडा उमेदवार देणार आहे. यावरून सुजय विखेंना नगर दक्षिण लोकसभा जड जाणार हे स्पष्ट झाले आहे.

लेखक : विनोद सुर्यवंशी, राजकीय अभ्यासक, मो. 9142587777

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*