
अहमदनगर :
सोशल मीडिया हे दुधारी अस्त्र आहे. एकदा तेच-त्या पद्धतीने वापरले की बऱ्याचदा ते अंगावर येण्याची शक्यता असते. भाजपच्या ट्रोल आर्मीला तसाच धडा मिळाला आहे. मै भी चौकीदार हा ट्रेंड त्यामुळेच सध्या जोरदार चर्चेत आहे.
स्वतःच्या हॅशटॅगवर भाजप स्वतः च ट्रोल झाल्याचे हे आणखी एक उदाहरण आहे. राहुल गांधी यांच्या चौकीदार चोर है या घोषणेला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून #MainBhiChowkidar नावाची मोहीम ट्विटरवर सुरू करण्यात आली होती. ज्याद्वारे मोदी यांच्या समर्थनार्थ मोहीम राबविण्यात येणार होती. जे या हॅशटॅग चा वापर करतील त्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून automatic उत्तम दिल जाणार होत. परंतु, सोशल मीडियावर लोकांनी या मोहिमेची अक्षरशः खिल्ली उडवली. मोहीम सुरू झाल्यानंतर काही क्षणातच नीरव मोदी, विजय मल्ल्या या पळून गेलेल्या उद्योगी मंडळींच्या पॅरोडी खात्यांवरून ट्विट करून मोदींचा त्याला दिलेला रिप्लाय व्हायरल झाले. त्याने सोशल मिडियावर जोरदार धुमाकूळ घातला आहे.
(द्वारा : राहुल ठाणगे, अहमदनगर)
Be the first to comment