मोदींपेक्षा सुजय विखे मग्रूर; जोरदार टीका

अहमदनगर :

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मग्रूर म्हणून ओळखले जातात. मात्र, मोडींपेक्षा काँग्रेसचे बंडखोर व भाजपवासी झालेले सुजय विखे जास्त मग्रूर असल्याची टीका शिवसेनेतून राष्ट्रवादीच्या गोटात आलेल्या घनश्याम शेलार यांनी केली आहे.

घनश्याम शेलार यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. फक्त शिवसेना स्वबळावर लढणार या मुद्द्यावर शिवसेनेत गेलो पण, युतीमुळे सेना सोडली असे सांगत यावेळी त्यांनी उद्धव ठाकरें सारखा खोटं बोलणारा नेता अजुन बघितला नाही अशी खरमरीत टीका त्यांनी केली.
गेल्या महिन्यापासून पवारांचे लक्ष्य बनवलेले सुजय विखेंवरही त्यांनी टीका केली. प्रधानमंत्री मोदी हे मग्रुर म्हणून लोकांना माहिती आहेत. मात्र, सुजय विखे हे मोदींपेक्षाही जास्त मग्रूरतेचे उदाहरण आहे. सुजय विखेंवर टीका करत पुन्हा पवारांचे मन जिंकण्याचा प्रयत्न शेलार यांनी केला आहे.
नगरमध्ये राष्ट्रवादीचा विजय आणि सुजय यांचा पराभव झालेला दिसेल असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*