जागा नको पक्षाला, कॅबिनेट द्या मला..!

मुंबई :

जागा नको पक्षाला पण कॅबिनेट द्या मला, असेच म्हणण्याची वेळ सध्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर शिवसेना व भाजप यांनी आणली आहे.

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना सातत्याने डावलले जात आहे. जागावाटप ठरल्यानंतर आधी इशारा मग विनंती आणि एकदम नेमस्तपणे मला कॅबिनेट द्या अशी मागणी आठवले यांनी केली आहे. पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे मी बघून घेईन, तुम्ही कॅबिनेटचे बघा असे त्यांनी सांगितले. भाजपसोबत असणाऱ्या आठवले, जानकर, सदाभाऊ खोत यांची मोठी अडचण झाली आहे. ह्यांना किंवा त्यांच्या पक्षाला एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळे सगळ्यांनी आपापल्या परीने चाचपणी सुरू केली असली तरी आठवले हे अजुनही तयारीला न लागता मागण्या करण्यावरच भर देत आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*