गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांचे निधन

पणजी :

स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्यांचे निधन झाले. गेल्या काही महिन्यापासून ते कर्करोगाच्या दीर्घ आजाराने ग्रस्त होते.
वयाच्या 64व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास. आमदार झालेले पहिले आयआयटीयन ते होते. गोव्याचे मुख्यमंत्री, माजी संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम केले होते.भाजपमधील अजातशत्रू व्यक्तीमत्व हरवले.

पणजी येथे त्यांचे राहात्या घरी निधन झाले. गेली दोन दिवस त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यानंतर त्यांना कृत्रीम ऑक्सीजन देण्यात आला. साधी राहणी आणि स्वच्छ प्रतिमा हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*