मोहिते पाटील गट आक्रमक; भाजपत जाण्याची शक्यता

सोलापूर :

नगरच्या जागेसाठी विखे पाटील गटातील तरुण नेते डॉ. सुजय विखे यांनी भाजपवासी होत कॉंग्रेस-राष्ट्रवादीला आव्हान दिले आहे. त्याचाच कित्ता गिरवत आता माढा येथून उमेदवारी न मिळाल्यास भाजपची वाट चालण्याची तयारी मोहिते पाटील गटाने केल्याची चर्चा आहे. मोहिते पाटील गटाने याबद्दल आडमार्गाने बोलण्यास सुरुवात केली आहे.

खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी उमेदवारी देण्यास तयार आहे. मात्र, मुलगा रणजितसिंग यांना येथून उमेदवारी मिळण्याची आस मोहिते पाटील गटाला आहे. त्यातून हा तिढा निर्माण झाल्याचे बोलले जाते. मात्र, मोहिते गटालाच उमेदवारी डावलण्याची ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तयारी केल्याने मोहिते गट आक्रमक झाल्याचे बोलले जात आहे. एकूणच माढा आणि सोलापूर जिल्ह्यात यामुळे तिढा निर्माण झाला आहे. तो पवार साहेब कसा सोडवितात यावर मोहिते पाटील गटाचा पक्ष ठरणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*