पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; मोहिते भाजपत जाणार

पुणे :

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून माजी खासदार रणजितसिंग मोहिते पाटील यांना उमेदवारी डावलली जात असल्याच्या निषेधार्थ सोलापूरमधील मोहिते पाटील गटाने भाजपवासी होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार उद्या (बुधवार) दुपारी मुंबईत वानखेडे मैदानावर मोहिते गट भाजपत जाणार आहे.

अकलूज (ता. माळशिरस) येथील जाहीर सभेत बोलताना रणजितसिंग मोहिते यांनी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना सांगून त्यासाठी भाजपमध्ये जात असल्याची घोषणा केली. तर, खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दोन महिन्याने बोलण्याचा कालावधी असल्याचे सूचक वक्तव्य करून आपणही भाजपमध्ये जात असल्याचे स्पष्ट केले आहे आहे. एकूणच यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडणार असल्याचे दिसते. त्यावर पवार साहेब कोणते औषध वापरणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*