गुढीपाडव्याला अधिक बोलणार : राज ठाकरे

मुंबई :

नरेंद्र मोदी हे देशातील सर्वाधिक खोटारडे पंतप्रधान आहेत. ते रोज काय बोलतात हे युट्युबवर जाऊन पाहिल्यास कोणालाही समजेल. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मला पोपट म्हणत असले तरी त्यांची कापडे आम्ही काढली आहेत. त्यांना पोपट दिसतोच कसा? फडणवीस कोट घातलेला फुगा आहे, अशी जहरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या सभेत केली.

जाहीर सभेत ठाकरे म्हणाले की, आजच्या सभेत यापूर्वी काही राहिलेले मुद्दे बोलायला आलो आहे. गुढीपाडव्याला अधिक बोलणार आहे. देशातून मोदी व अमित शाह यांची सत्ता घालविण्यासाठी मनसे काम करणार आहे. त्याचा कोणाला फायदा होतोय यापेक्षा मोदी-शाह ही देशातील प्रश्न निर्माण करणारी जोडगोळी सत्तेतून घालविणे हेच मनसेचे ध्येय्य असेल. त्यासाठी मनसैनिकांनी भाजपच्या विरोधात कामाला लागावे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी पुढचे पाहू, असेही त्यांनी सांगितले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*