सातजणांनी भरले उमेदवारी अर्ज

मुंबई / नागपूर :

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील १० मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. आज पहिल्या दिवशी ३ मतदारसंघातील जागांसाठी ४ जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.

भंडारा-गोंदिया मतदारसंघात सुहास अनिल फुंदे (अपक्ष) आणि भीमराव डी. बोरकर (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया(डी)), नांदेडच्या जागेसाठी पठाण जाफर अली खान एम. खान (इंडियन डेमोक्रॅटिक मूव्हमेंट) आणि सोलापूर मतदार संघात वेंकटेश्वर एम. अलियास खटकधोंड (हिंदुस्थान जनता पार्टी) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काल नागपूर लोकसभा मतदार संघात अब्दुल करीन अब्दुल गफ्फार पटेल (अपक्ष) तर, यवतमाळ मतदार संघात सुनील नटराजन नायर (अपक्ष) आणि रमेश जी. पवार (भारतीय बहुजन आघाडी जनता दल (एस.)) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने ही माहिती दिली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*