शिर्डीतून आमदार कांबळे यांना उमेदवारी

अहमदनगर :

लोकसभा निवडणूकिसाठी काँग्रेस पक्षाने शिर्डी या राखीव जागेवर श्रीरामपूर येथील आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी मुकुल वासनिक यांनी महाराष्ट्र व केरळमधील एकूण ११ जागांसाठीच्या उमेदवार यादीवर स्वाक्षरी केली आहे. त्याचीच प्रत सोशल मीडियातून व्हायरल होत आहे. आमदार कांबळे हे उत्तम जनसंपर्क असलेले उमेदवार असल्याने आता त्यांना तोडीस तोड म्हणून शिवसेना-भाजप आघाडी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देणार की नवीन कार्यकर्त्याला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*