अखेर नगर जिल्हा काँग्रेसला मिळाला चेहरा

अहमदनगर :

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार जयंत ससाणे यांच्या निधनानंतर नगर जिल्हाध्यक्ष हे पद रिकामे होते. मधल्या काळात या पदावर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांना प्रभारी म्हणून संधी मिळाली. मात्र, ते सुजय विखे यांच्यासमवेत भाजपाच्या गोटात गेल्याने आता नगर जिल्हा काँग्रेसला नवा चेहरा मिळाला आहे.

दिवंगत ससाणे यांचे पुत्र करण ससाणे यांना जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्तीपत्र मिळाले आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी वेणूगोपाल यांनी त्यांना हे पत्र दिले आहे. एकूणच या नियुक्तीने शिर्डीसाठी काँग्रेस आक्रमक असल्याचा संदेश मतदारांमध्ये जाण्यासाठी पक्ष प्रयत्नशील दिसतो. शिर्डीतून पक्षाने माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी जाहीर करून कामाला लागण्याचा संदेश दिला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*