चौकीदार नाही, जनताच चोर : शेतकरी संघटना

नागपूर :

सध्या देशभरात कोणीही उठसूट चौकीदार होतोय. भाजपवाले चौकीदार होत असताना काँग्रेसवाले त्यांना चोर म्हणत आहेत. हे दोन्ही पक्ष शेतकऱ्यांच्या समस्यांवर मात्र, ठरवून गप्प आहेत. खरे म्हणजे या देशातील जनताच चोर आहे, म्हणून असले चोर आणि दरोडेखोर निवडून येतात, अशी टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केली.

अकोला येथील कार्यक्रमात त्यांनी कोणताही पक्ष शेतीच्या मुद्यासाठी लढत नसल्याचे सांगत शेतकरी संघटनेच्या स्वतंत्र भारत पक्षातर्फे यंदाची निवडणूक शेतकरी धोरणावर लढण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील ४० जागांवर शेतकरी संघटना उमेदवार देणार आहे. कालपर्यंत सत्ताधाऱ्यांवर टीका कराणारे आता सत्तेसाठी त्यांचे गोडवे गात आहेत. सत्तेसाठी सर्व राजकीय पक्षांनी शेतकरी व कष्टकरी जनतेची पिळवणूक आणि फासाव्णूक केली आहे. त्यामुळेच यंदा याकडे लक्ष वेधून कृषी धोरणावर निवडणूक आणण्यासाठी स्वतंत्र भारत पक्ष निवडूक ताकदीनिशी लढविणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*